top of page

Botany Videos

Birds Videos

World Sparrow Day I  जागतिक चिमणी दिवस | Dr. Chetna Ugale
03:07

World Sparrow Day I जागतिक चिमणी दिवस | Dr. Chetna Ugale

20 March World Sparrow Day I जागतिक चिमणी दिवस | Dr. Chetna Ugale वाढणारी शहरे, मानवी वस्ती आणि सतत विस्तारत असणारा शहरी भूभाग. अश्या जगात, एक लहान पक्षी आहे ज्याकडे अनेकदा लक्षच दिले जात नाही, पण तरीही त्याची उपस्थिती आपल्या पर्यावरणासाठी अमूल्य आहे. तो पक्षी दुसरा कुणी नाही तर ती आहे आपली चिऊ ताई. लहानपानासवूनच आपण चिऊ ताईच्या गोष्टी ऐकून मोठे झालो. पण काय कोण जाणे आता चिऊ दिसेनाशी होत आहे. म्हणूनच 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस, या लहान पक्ष्यांच्या कमी हिणाऱ्या संख्येबद्दल आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. तुम्हाला माहीत आहे का? चिमण्या आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे लहान पक्षी, कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. फुलांचे परागकण करतात आणि बिया विखुरतात आणि आपल्या पर्यावरणाच्या आरोग्यास हातभार लावतात. वाढलेल्या शहरीकरनामुळे आणि काँक्रीट याचा अतिवापर, रासायनिक खते आणि कमी होत जाणारे अधिवास यामुळे चिमण्याची संख्या कमी होत आहे. तर मग आपण चिमण्यांची संख्या वाढवायला काय करू शकतो ? आपल्या घरासमोर येणाऱ्या चिमण्यांना संरक्षन देऊन. त्यांच्यासाठी ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, गहू, नाचणी, यासारखे त्यांचे आवडते खाद्य एका पसरट भांड्यात अंगणात ठेवाव्या किव्वा बरणीत भरून, त्या बरण्या झाडांना टांगण्यात याव्या. सोबतच पिण्यासाठी पाणी ठेवावे. चिमण्या फक्त पाणीच पित नाही तर त्या मध्ये आंघोळ देखील करतात म्हणून पसरट भांडे योग्य. आणि त्यांच्या साठी अधिवास तयार करणे. घर भोवताल झाडे लावणे आणि कृत्रिम लाकडी घरटी ठेवू शकतो. मग बघा.. कशी तुम्हाला चिऊ ताई चिव चिव आवाज देईल. एका चिमणी पासून सुरवात होऊन अनेक चिमण्या खाण्याकरिता पिण्याकरिता अंगणात येईल. तर मग, यावर्षी आपण जागतिक चिमणी दिवस साजरा करत असताना, आपल्या चिऊ ताईला वाचविण्याचा प्रयत्न करू या. कारण जेव्हा आपण चिमण्यांचे रक्षण करतो तेव्हा आपण केवळ फक्त एका पक्ष्यांच्या प्रजातीचे रक्षण करत नाही, पर्यावरणाचा समतॊल जपतो. डॉ. चेतना उगले, सहा. प्रा. इंदिरा महाविद्यालय कळंब, महाराष्ट्र पक्षीमित्र यवतमाळ जिल्हा समन्वयक.
bottom of page